पोस्ट्स

मे, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वारकरी संप्रदायाच्या बदनामी मागील ‘राजकारण’

इमेज
देशात डावे, पुरोगामी, समाजवादी, मार्क्सवादी, इस्लामवादी आणि मिशनरी चर्च यांची अघोषित युती आहे. ते एकमेकांच्या विरोधात जाणार नाहीत आणि एकमेकांना पूरक मदत करतील ही आधीपासूनच त्यांची योजना. त्यानुसार ते एकमेकांना प्रत्येक घटनेत मदत करताना दिसतात.  २०१४ पासून ‘हिंदुत्व’ विचारांचे राजकीय परिवर्तन झाल्यामुळे ही सर्व डावी गँग आधीच विचलित होती. ‘हिंदुत्व’ आणि ‘धर्म’ बदनाम करण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलन आणि आरोप केले. देशात अराजकता निर्माण करण्याचेही प्रयत्न झाले. पण त्याचा परिणाम झाला नाही. मोदी दुसऱ्या आणि तिसऱ्या टर्म मध्येही निवडून आले.  महाराष्ट्रात २०१९ च्या निवडणुकीत ठाकरेंना फोडण्यात डाव्यांना यश आले. त्यामुळे महाराष्ट्रातील दुसरी टर्म अडीच अडीच वर्ष आणि पक्ष फुटीच्या वादात गेली. त्यानंतर २०२४ च्या विधानसभेसाठी डाव्यांनी जातीयवादी कार्ड खेळून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. ‘मराठा’ विरुद्ध ‘ओबीसी’ असा वाद पेटवला. आदिवासी, मातंग, वंजारी, धनगर, दलीत यांना चिथावण्याचे काम केले.  आता यावेळी ‘हिंदुत्व’ विचाराचे सरकार (महायुती) येणार नाही असे वाटू लागले होते....

पहलगाम हल्ला: हिंदूंना शत्रूबोधाची जाणीव करून देणारा दिवस

इमेज
२२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीर घाटीतील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर इस्लामिक दहशतवाद्यांनी धर्म विचारून केलेला हल्ला, त्याच्या जखमा, वेदना आजही ताज्या आहेत. पहलगाम हल्ल्यातील थरारक चित्र पाहिल्यानंतर आजही तळपायाची आग मस्तकात जाते. २६ भारतीयांची ते केवळ हिंदू आहेत म्हणून निर्घृण हत्या करण्यात आली होती, तर अनेकजण जखमी झाले होते.  पहलगाम हल्ल्यातून केवळ इस्लामिक दहशतवादाचा चेहरा उघड झाला नव्हता, तर इस्लामवाद्याची पाठराखण करणारे घरभेदी सेक्युलर पुरोगामी जमात आणि त्यांचे खोटा धर्मनिरपेक्षतावाडी अजेंडा सुद्धा उघड झाला होता. आज या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले. त्याच्या वेदना जिवंत असल्या तरी त्यापासून आम्ही काय शिकणार आणि काय लक्षात ठेवणार? हे महत्वाचे आहे.  काही घटना/ प्रसंग जे लक्षात ठेवलेच पाहिजे–  – पहलगाम हल्ला झाल्यापासून पाच दिवसात भारतात वेगवेगळ्या ठिकाणी पहलगाम हल्ल्याचा प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष समर्थन केले म्हणून अनेक जणांवर गुन्हे दाखल झाले होते.  – निषेध आंदोलनात पाकिस्तानचा झेंडा जाळला आणि पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या म्हणून विरोध झाला. सामाजिक तेढ व दंगल...

आठवणीतील ‘योगेशभाऊ मानकर’

इमेज
एखाद्या व्यक्तीची सामाजिक, वैचारिक प्रतिमा घडण्यासाठी बालमनावर काही व्यक्तींचा नक्की प्रभाव झालेला असतो. माझ्या बालपणी मनावर प्रभाव झालेल्या अनेकांपैकी एक म्हणजे योगेश भाऊ. योगेश भाऊंचा निर्भीडपणा, धाडसी, करारी स्वभाव माझ्या मनाला बालपणीच भावला होता. बाजार पट्ट्यातील हनुमान मंदिरातील शनिवारच्या आरतीनंतर थोडावेळ राष्ट्रीय विषयावर चर्चा व्हायची. त्याठिकाणी खास योगेश भाऊंना ऐकण्यासाठी मी आवर्जून जायचो. एखाद्या दिवशी योगेश भाऊ आले नाही की मन नाराज व्हायचे. त्यावेळेस संघ, बजरंग दल, हिंदुत्व असे फार काही कळत नव्हते. परंतु ही लोक देशहितासाठी काहीतरी मोठ काम करतात हे लक्षात यायचे. जसजसा मोठा झालो तसा योगेशभाऊ सोबत चांगली ओळख झाली.  एकदा रामनवमी मिरवणुकीत ‘बनाएंगे मंदिर’ गाणे लावले म्हणून पोलिसांनी बँड जप्त केला. अनेक विनंत्या करूनही ते बँड देईना. पोलिस स्टेशनसमोर मोठी गर्दी जमली होती. सामंजस्याची भूमिका घेऊन पोलिस ऐकत नाही हे पाहून योगेशभाऊ आपल्या काही कार्यकर्त्यांसह आत गेले आणि “बँड देता... का आम्ही सामूहिक बनायेंगे मंदिर म्हणू?” असा धमकीवजा इशाराच पोलिसांना दिला. योगेशभाऊंची...