पहलगाम हल्ला: हिंदूंना शत्रूबोधाची जाणीव करून देणारा दिवस


२२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीर घाटीतील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर इस्लामिक दहशतवाद्यांनी धर्म विचारून केलेला हल्ला, त्याच्या जखमा, वेदना आजही ताज्या आहेत. पहलगाम हल्ल्यातील थरारक चित्र पाहिल्यानंतर आजही तळपायाची आग मस्तकात जाते. २६ भारतीयांची ते केवळ हिंदू आहेत म्हणून निर्घृण हत्या करण्यात आली होती, तर अनेकजण जखमी झाले होते. 

पहलगाम हल्ल्यातून केवळ इस्लामिक दहशतवादाचा चेहरा उघड झाला नव्हता, तर इस्लामवाद्याची पाठराखण करणारे घरभेदी सेक्युलर पुरोगामी जमात आणि त्यांचे खोटा धर्मनिरपेक्षतावाडी अजेंडा सुद्धा उघड झाला होता. आज या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले. त्याच्या वेदना जिवंत असल्या तरी त्यापासून आम्ही काय शिकणार आणि काय लक्षात ठेवणार? हे महत्वाचे आहे. 

काही घटना/ प्रसंग जे लक्षात ठेवलेच पाहिजे– 

– पहलगाम हल्ला झाल्यापासून पाच दिवसात भारतात वेगवेगळ्या ठिकाणी पहलगाम हल्ल्याचा प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष समर्थन केले म्हणून अनेक जणांवर गुन्हे दाखल झाले होते. 

– निषेध आंदोलनात पाकिस्तानचा झेंडा जाळला आणि पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या म्हणून विरोध झाला. सामाजिक तेढ व दंगली घडवून आणण्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. विशेष म्हणजे यात जसे कट्टर इस्लामवादी आहेत तसे पुरोगामी, हिंदू द्वेषी विचारांचे लिब्रांडू सुद्धा आहेत. 

– धुळ्यात “हिंदूंना धर्म विचारून मारलेच नाही” असा खोटा प्रचार करणाऱ्या माजी उपसरपंच ताहीर बेग मिर्झा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

– संगमनेर येथे पहलगाम हल्ल्याचे समर्थन करणारे स्टेटस ठेवल्यावरून रेहान पटेल व सज्जाद पठाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. 

– पाकिस्तान विरोधी पोस्टर लावले म्हणून जयपूर राजस्थान येथे मुस्लिम जमावाचा दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला होता. 

– मुंबईच्या सांताक्रूझ मध्ये पाकिस्तानचा झेंडा जाळला म्हणून मुस्लिम जमावाने एका व्यक्तीला मारहाण केली. 15 जणांवर गुन्हे दाखल झाले होते. 

– कर्नाटक मध्ये रस्त्यावर फेकलेले पाकिस्तानचे झेंडे दोन मुस्लिम महिलांनी उचलून घेतल्याचे व्हिडिओ वायरल झाले होते. पाकिस्तानी झेंड्याचा एवढा आदर का, असा प्रश्न उपस्थित झाला होता.

– पहलगाम हल्ला धर्म विचारून झाला हे पूर्ण जगाने ऐकले, पाहिले. तरीसुध्दा पुरोगाम्यांचे पितामह शरद पवार म्हणतात आताच धर्म का पाहिला जातोय? मी अजून ऐकलंच नाही की धर्म पाहून गोळ्या झाडल्या. 

– अभिनेता किरण माने हा या हल्ल्याला संशयास्पद असल्याचं म्हणत होता. डॉ संग्राम पाटील म्हणतो इलेक्शन आले की असे आतंकवादी हल्ले का होतात? म्हणजे वस्तुस्थिती मान्यच करायची नाही.

– राष्ट्रवादीचा विकास लवांडे म्हणतो हा हल्ला म्हणजे पुलवामाची पुनरावृती आहे का? म्हणजे त्याने पुलवामा हल्ल्यावर सुद्धा संशय घेतलाय आणि पहलगाम हल्ल्यावर ही संशय घेतला आणि आपल्याच सरकार आणि सुरक्षा एजन्सीवर शंका घेतली. 

– काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारने तर हद्दच केली. हे महाशय म्हणत होते, “दहशतवादी तुझा धर्म काय, तुझं नाव काय अस विचारत बसतो का?” असे विधान म्हणजे हिंदूंची अक्षरशः थट्टा केली होती. किती हा नालायकपणा? सेक्युलॅरिझमच्या नावाखाली तुम्ही दहशतवाद्यांना क्लीन चिट देताय यापेक्षा मोठा गुन्हा काय?

विविध सेक्युलर, पुरोगामी राजकीय पक्षातील नेत्यांनी अशीच भूमिका घेतलीय. आजवर इस्लामिक दहशतवाद्यांनी अनेकवेळा धर्म पाहूनच हल्ला केलाय तरीही ही मंडळी दहशतवादाला धर्म नसतो असे वारंवार खोटे भासवत असतात. देशाला आणि हिंदूंना अश्या वैचारिक विकृतीचा सर्वात जास्त धोका आहे. या घटनेने हिंदूंना आपले छुपे शत्रू आणि उघड शत्रू कोण हे लक्षात आणून दिले. त्यांना आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे आणि लोकशाही पद्धतीने यांना धडा शिकवला पाहिजे. 

पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या हिंदू बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली. 

– कल्पेश जोशी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

स्वामी रामानंद तीर्थ - बालपण ते संन्यास