माणसाकडून पशुत्वाकडे..?
बीबीसी मराठीचा लेख वाचला. लग्न न करता एकट्याने राहण्याचे फायदे असतात का? असे त्याचे शीर्षक आहे. म्हणजे वाटते असे की यात विश्लेषण असेल. फायदा की तोटा? परंतु यात पूर्णपणे ejach बाजू मांडली आहे फायद्याची. म्हणजे बीबीसीला हे सांगायचे आहे की आता लोकांनी लग्न वगैरे न करता अविवाहित राहून मानवी संस्कृतीतून पशूंच्या संस्कृतीकडे(?) जावे? कुठल्या लेव्हलला भारताच्या तरुण पिढीला बरबाद करणे सुरू आहे बघा. आजकाल अनेक तरुण तरुणी लग्नाचे विचारल्यावर नाही म्हणतात. पूर्वीही म्हणायचे. खरं म्हणजे त्या नकारामध्येच होकार असतो. काही वेळेस वेगळे ध्येय, प्लॅनिंग असू शकते. पण उशिराने का होईना लग्न सुरू आहेत. पण लग्नच नाही करायचे, लग्न म्हणजे बंधन, लग्न म्हणजे पारतंत्र्य, लग्न म्हणजे निराशा, वाद अशी मानसिकता करण्यात आली आहे. चित्रपट, टीव्ही मालिका, रिऍलिटी शो, वेब सिरीज, आता सोशल मिडिया अशा एक ना अनेक माध्यमातून लग्नाची संकल्पना विद्रूप करण्यात आली आहे असे वाटत नाही का? कोणाच्या लग्नाची बातमी सुद्धा लिहिताना आमका व्यक्ती विवाह बंधनात अडकणार, लग्नाच्या बेडीत अडकणार असेच असते. नकळतपणे सम...