वारकरी संप्रदायाच्या बदनामी मागील ‘राजकारण’

देशात डावे, पुरोगामी, समाजवादी, मार्क्सवादी, इस्लामवादी आणि मिशनरी चर्च यांची अघोषित युती आहे. ते एकमेकांच्या विरोधात जाणार नाहीत आणि एकमेकांना पूरक मदत करतील ही आधीपासूनच त्यांची योजना. त्यानुसार ते एकमेकांना प्रत्येक घटनेत मदत करताना दिसतात. 

२०१४ पासून ‘हिंदुत्व’ विचारांचे राजकीय परिवर्तन झाल्यामुळे ही सर्व डावी गँग आधीच विचलित होती. ‘हिंदुत्व’ आणि ‘धर्म’ बदनाम करण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलन आणि आरोप केले. देशात अराजकता निर्माण करण्याचेही प्रयत्न झाले. पण त्याचा परिणाम झाला नाही. मोदी दुसऱ्या आणि तिसऱ्या टर्म मध्येही निवडून आले. 


महाराष्ट्रात २०१९ च्या निवडणुकीत ठाकरेंना फोडण्यात डाव्यांना यश आले. त्यामुळे महाराष्ट्रातील दुसरी टर्म अडीच अडीच वर्ष आणि पक्ष फुटीच्या वादात गेली. त्यानंतर २०२४ च्या विधानसभेसाठी डाव्यांनी जातीयवादी कार्ड खेळून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. ‘मराठा’ विरुद्ध ‘ओबीसी’ असा वाद पेटवला. आदिवासी, मातंग, वंजारी, धनगर, दलीत यांना चिथावण्याचे काम केले. 

आता यावेळी ‘हिंदुत्व’ विचाराचे सरकार (महायुती) येणार नाही असे वाटू लागले होते. पण दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातील संतांनी, धर्माचार्यांनी खेडोपाडी जाऊन समाज प्रबोधन करून समाजाला योग्य दिशा दिली. किर्तन प्रवचनातून समाजात पुन्हा एकोपा निर्माण केला. समाज फुटण्यापासून वाचवला. त्याचा परिणाम म्हणून २०२४ ची विधानसभेत डाव्यांचा (महा आघाडी) दारूण पराभव झाला. 

‘वोट जिहाद’च्या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकीत मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान डाव्या आघाडीला जातील असे पूर्ण नियोजन होते. तो पुरता फेल गेला. उलट वोट जिहादचे बिंग फुटले. त्यामुळे हिंदूंनी महायुतीला भरघोस मते दिली.

ही होती तात्कालिक परिस्थिती. परंतु संप्रदायाने आधीपासून समाज जोडण्याचे काम केले आहे. त्यांनी विषमतेवर प्रहार केले तसे धर्म जागरणही केले. सांस्कृतिक आक्रमणाच्या विरोधात जागरण केले. लव जिहाद, वोट जिहाद, जातीयवाद, फुटीरतावाद याबद्दल त्यांनी समाजाला जागृत केले. त्याचा राजकीय फायदा–तोटा कोणाला होईल याची पर्वा संत किंवा वारकरी संप्रदाय करत नाही. (संतांच्या वाटेने जाणाऱ्याला मात्र फायदा झाल्याशिवाय राहत नाही.) 

परंतु ज्यांना केवळ आपले राजकारण आणि सत्ता प्रिय आहे अशा नतदृष्टांनी संतांना लक्ष्य बनवले आहे. ज्यांचे राजकारण फुटीरतावादावर आधारलेले आहे त्यांना संत, वारकरी, धर्माचार्य, आध्यात्मिक चळवळी त्यांच्या मार्गातील मोठे अडसर वाटतात. वारकऱ्यांनी आपापले देवळात बसून टाळ कुटत बसावे. पोथ्या पारायणे करावी. वारी करावी. नसत्या समाज प्रबोधनाच्या भानगडीत पडू नये अशी या अराजकवाद्यांची भूमिका आहे. आणि म्हणूनच वारकरी संप्रदायाची अतोनात बदनामी सुरू आहे हे लक्षात घेतले पाहिजे. 

पण त्यांना हे माहित नाही समाज संतांच्या सोबत आहे. ‘फोडणारे’ कोण आणि ‘जोडणारे’ कोण हे समाज चांगलेच समजून चुकला आहे. एकवेळ देवाच्या विरोधात गेले तर देव उदार अंतःकरणाने क्षमा करतो, परंतु जो संतांच्या विरोधात जातो त्याचे निश्चित वाटोळे झाल्याशिवाय राहत नाही असे तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे. 

– कल्पेश जोशी (छ. संभाजीनगर) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

स्वामी रामानंद तीर्थ - बालपण ते संन्यास