पोस्ट्स

बॉलिवूड बदलतोय..?

इमेज
भारतीय सेलिब्रिटी दुटप्पी, ढोंगी असल्याची सारखी टीका होत असते. विशेषता बॉलिवूड कलाकारांवर हिंदुविरोधी, सेक्युलर असल्याची कायम टीका होते. त्यामध्ये बहुतांशी तथ्य आहेच. परंतु अलीकडील काळात काही परिवर्तन होताना दिसत आहे. देशहितासाठी आणि हिंदूंच्या बाजूने सुद्धा काही कलाकार निर्भीडपणे समोर येऊन बोलू लागले आहेत.  बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल नुकतीच अभिनेत्री रविना टंडन, जान्हवी कपूर, जया प्रदा, काजल अग्रवाल, प्रणिता सुभाष तसेच अभिनेते मनोज जोशी, गायक टोनी कक्कर यांनी प्रतिक्रिया दिली. यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या. हिंदू समाजाकडून या कलाकारांच्या प्रतिक्रियांचे स्वागत करण्यात आले.  मला तर कायमच प्रश्न पडायचा की सगळेच कलाकार इतके सेक्युलर, ख्रिस्ती किंवा मुस्लिम लांगुलचालन करणारे कसे आहेत? काहीजण तरी अपवादात्मक असतील की नाही? अलीकडील काळात हे अपवाद समोर आल्यामुळे समाधान वाटत आहे. राष्ट्रहित, राष्ट्रीय एकता, समरसता अशा विषयांवर काही कलाकार मुक्तपणे बोलू लागले आहेत. मागे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी अनेक कलाकारांनी आपली श्रद्धा व्यक्त केली...

लिब्रांडू जमातीची दिवास्वप्ने

इमेज
बांगलादेश, नेपाळ मध्ये हिंसक मार्गाने सत्तांतर घडवले तसे भारतातही झाले पाहिजे किंवा होईल अशी दर्पोक्ती काही जण करत असतात. त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांसह डावे पुरोगामी लिब्रांडू सुद्धा आहेत. आता व्हेनेन्झुएला मध्ये झालेली हिंसक घडामोडी पाहता भारतात सुद्धा व्हेनेंझुएला सारखे होईल अशी भाषा होत आहे.  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुन्हा बरळले आहेत. मुळात या लोकांना भारताच्या संविधानावर विश्वास नाही, की भारताची लोकशाही संपवायची आहे तेच कळत नाही. आपल्या हातची सत्ता गेली आणि जनतेने घरी बसवले की लोकशाहीविरोधी मार्गाने सत्ता काबीज करण्याची काँग्रेसची मानसिकता नवी नाही. इंदिरा गांधींनी तेच केले होते आणि देशात आणीबाणी लादून संविधानाचा गळा घोटण्याचे पाप केले होते.  आजची काँग्रेस, डावे, पुरोगामी तेच स्वप्न पाहत आहे. परंतु खरच असे शक्य आहे का? दिल्ली दंगल असो, शाहिनबाग आंदोलन, CAA आंदोलन किंवा किसान आंदोलन असो. या आंदोलनातून देशातील सत्ता उलथवून टाकण्याचेच कारस्थान सुरू नव्हते का? पण हाती काय लागले? आज सगळी आंदोलने मागे पडली, परंतु राष्ट्रीय विचारांची सत्ता अ...

माणसाकडून पशुत्वाकडे..?

इमेज
बीबीसी मराठीचा लेख वाचला. लग्न न करता एकट्याने राहण्याचे फायदे असतात का? असे त्याचे शीर्षक आहे.  म्हणजे वाटते असे की यात विश्लेषण असेल. फायदा की तोटा? परंतु यात पूर्णपणे ejach बाजू मांडली आहे फायद्याची. म्हणजे बीबीसीला हे सांगायचे आहे की आता लोकांनी लग्न वगैरे न करता अविवाहित राहून मानवी संस्कृतीतून पशूंच्या संस्कृतीकडे(?) जावे? कुठल्या लेव्हलला भारताच्या तरुण पिढीला बरबाद करणे सुरू आहे बघा.  आजकाल अनेक तरुण तरुणी लग्नाचे विचारल्यावर नाही म्हणतात. पूर्वीही म्हणायचे. खरं म्हणजे त्या नकारामध्येच होकार असतो. काही वेळेस वेगळे ध्येय, प्लॅनिंग असू शकते. पण उशिराने का होईना लग्न सुरू आहेत.  पण लग्नच नाही करायचे, लग्न म्हणजे बंधन, लग्न म्हणजे पारतंत्र्य, लग्न म्हणजे निराशा, वाद अशी मानसिकता करण्यात आली आहे. चित्रपट, टीव्ही मालिका, रिऍलिटी शो, वेब सिरीज, आता सोशल मिडिया अशा एक ना अनेक माध्यमातून लग्नाची संकल्पना विद्रूप करण्यात आली आहे असे वाटत नाही का? कोणाच्या लग्नाची बातमी सुद्धा लिहिताना आमका व्यक्ती विवाह बंधनात अडकणार, लग्नाच्या बेडीत अडकणार असेच असते. नकळतपणे सम...

खोटा भाईचारा पुरे झाला...!

इमेज
अनेक मुस्लिम बांधवांनी गणपती बसवले. पूजा केली. त्यामध्ये अनेक कलाकार आहेत. फिल्मी अभिनेते अभिनेत्री आहेत. त्याचे स्वागतच आहे. कारण हीच आपली मूळ संस्कृती आहे. भलेही आज काळाच्या ओघात काही कारणास्तव पूजा पद्धती बदलली असेल. पण आपली राष्ट्रीय संस्कृत एकच आहे ती म्हणजे सनातन संस्कृती, हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती.  पण कोणीतरी उठतो, हातात कॅमेरा आला म्हणून काहीही दाखवतो. खोटा भाईचारा लादतो. तर समाजाला हे आवडत नाही. सोयीनुसार काही गोष्टी जर समाजावर थोपवल्या जातील तर लोक विरोध करणारच ना?  एवढाच भाईचारा आणि सामाजिक सलोखा दाखवायचा आहे तर जे मुस्लिम गणपती बसवता त्यावर शॉर्टफिल्म करा. ती वास्तविकता आहे. मुस्लिम समाजात गणपती विषयी किती श्रद्धा आहे ते दाखवा, त्याचे अनेक उदाहरण आहे. पण ते सोडायचे आणि मुस्लिम दुकानदारांची मार्केटिंग करायची आणि ती भाईचाऱ्याच्या नावाखाली खपवायची हे चाळे सुज्ञ समाज कधीच सहन करणार नाही.  कोण कुठला अथर्व सुदामे. कालपर्यंत त्याला कोणी ओळखत नव्हता. पण व्हिडिओ मधून त्याने केलेल्या स्टंटबाजी मुळे तो चर्चेचा मुद्दा बनला. फॉलोअर्स वाढवण्या...

भारताचा बांगलादेश होता होता राहिला का?

इमेज
भारताचा बांगलादेश होता होता राहिला का? जर मोदी सरकार 400 पार गेले असते तर काय झाले असते? ईव्हीएम वरून लोकांचा विश्वास का उडवला जात होता? ईव्हीएम वर कुऱ्हाडीने घाव का घातले जात होते? सुप्रीम कोर्टाच्या निकालाला सुद्धा मान्य न करणारी वक्तव्य का येत होती?  मोदी सरकार 400 पार गेले असते तर देशात सरकार, प्रशासन आणि न्याय व्यवस्थेवरील विश्र्वासच उडवून लावायचा आणि मोठी अराजकता निर्माण करायची असा डाव होता का?  बांगलादेशमध्ये जे काही होतंय त्यामागे असलेली डीप स्टेट, मुस्लिम कम्युनिस्ट महायुती, अमेरिकेचा हस्तक्षेप, जॉर्ज सोरोस सारख्या वोक धनाढ्य लोकांचा पाठिंबा हे काय दर्शवते? ही सर्व परिस्थिती आज विचारात घेता जे होते ते चांगल्या साठीच होते असे म्हणणे योग्य ठरेल.  प्रभू श्रीरामाने अयोध्येत स्वतःवर पातक लावून घेतले पण भारत वाचवला आहे. मोदींच्या थोड्या अपयशातच मोठा विजय झाला आहे. येणारा काळ अनेक गूढ समोर आणणार आहे. पण मोदी 400 पार न गेल्यामुळे भारत विरोधी शक्तींना आपला डाव साध्य करता आलेला नाही. या सर्व परिस्थितीतून आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे.  भारताचा शत्रू कोण आहे...

‘रिॲलिटी शो’ आणि काही गंभीर प्रश्न

इमेज
गेल्या काही दिवसात बॉलिवूड चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती विरोधी नरेटिव कश्या रीतीने चालवले गेले याची खूप चर्चा झाली. 1990 ते 2010 दरम्यान आलेले बरेच चित्रपट सेक्युलॅरिझम च्या नावाखाली कसे भारतीय संस्कृतीच्या विरोधी जनमानस तयार करत होते याची अनेक उदाहरणे समोर आली. पण चित्रपट, मालिका आणि विविध कलेच्या माध्यमातून समाजात केवळ भारत विरोधी, राष्ट्र विरोधी विष पेरले जात नव्हते तर भारतीय कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठीही प्रयत्न सुरू होते. मागील काही वर्षात साधारण 2001 पासून आलेल्या विविध रिॲलिटी शो, मालिका, अलीकडे आलेल्या बऱ्याच वेब सिरीज हेच नरेटिव घेऊन समाजाला (विशेषतः उच्चवर्गीय श्रीमंत वर्गाला) टार्गेट करताना दिसत आहे. समाज व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या, व्यसनी, अंग प्रदर्शन आदी वैशिष्ट्य असलेल्या कलाकारांना प्रोत्साहित केले जात आहे. बिग बॉस, रोडिज, स्प्लिटविला, इंडीयन मॅच मेकिंग, सुपर मॉडेल ऑफ इयर अश्या विविध रिॲलिटी शो च्या माध्यमातून तरुणाईवर मॉडर्नयझेशन वोकिजमचा विकृत प्रभाव टाकला जात आहे.  रिॲलिटी शो हा एक फसवा आणि स्क्रीप...

देश कोणी विकायला काढला होता?

इमेज
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विरोधक व विशेषतः काँग्रेस पक्षाकडून सारखा आरोप होत असतो की त्यांनी देश विकायला काढलाय. त्याच बरोबर सत्य, परखड आणि देशहिताची बाजू मांडणाऱ्या आजच्या माध्यमांना गोदी मीडिया म्हणून हिणवलं जातं. पण देश कोणी विकायला काढला आणि गोदी मीडिया कोण होतं, याचं एकच उदाहरण काँग्रेस आणि विरोधकांची झोप उडवून देऊ शकतं.  ज्या काळात सोव्हिएत रशिया बलाढ्य होता आणि त्याची केजिबी ही गुप्तचर यंत्रणा त्यांच्या काह्यातील देशांना वाळवी लावत होती, त्याच दरम्यान भारतात आलेल्या दोन केजीबी अधिकाऱ्यांनी (युरी बेझमेनोव्ह आणि व्हसिली मित्रोखिन) मोठे गौप्यस्फोट केले आहेत.  बेझमेनोव म्हणतात की भारत ही  जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असल्याचे कितीही सांगितलं जात असलं, तरी भारत ही एक निरंकुश राज्यव्यवस्था होती जिच्यावर जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांचा एक अधिकार चालत होता. तसेच भारत आपल्या अलिप्ततावादाचा कितीही गजर करत असला तरी तो सोवियत रशियाचा अंकित झालेला देश होता. इंदिरा गांधींनी राज्यकारभार सांभाळाला त्या क्षणापासून त्या रशियाच्या खिशात होत्या. इंदिरा गांधींच्या काळात ...