पोस्ट्स

आंदोलन आणि वास्तव (भाग २)

इमेज
        1955 च्या नागरिकत्व कायद्यानुसार कोणत्याही जाती धर्माच्या नागरिकाला भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी सलग 11 वर्ष भारतात निवास करण्याची अट होती, ती सरकारने हिंदू, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, इसाई आणि शीख समुदायासाठी कमी करून 6 वर्ष केली. या व्यतिरिक्त अन्य कोणाला भारताचे नागरिकत्व हवे असल्यास त्यांना 11 वर्षाची अट कायम आहे. त्यामुळे मुस्लिमांना या घटना दुरुस्तीमधून टाळले म्हणून संताप व्यक्त करण्याचा किंवा मुस्लिमांना भारतातून हकालण्याचा प्रश्नच येत नाही.        "आम्ही नाही, मग ते का?" हा हट्ट कश्यासाठी? विरोधी पक्षांनी मुस्लिम समुदायाच्या या बालहट्टाला राजकीय बूस्टर लावला आहे. मोदी सरकारविरोधात एवढ्या शक्तीनिशी विरोधकांना केवळ अशक्य होऊन बसले होते, ती संधी सीएए व एनआरसीच्या निमित्ताने चालून आली असल्यामुळे नवीन सरकारविरोधी नवीन मुद्दा हाती येत नाही तोवर सीएए व एनआरसी विरोधाचे गुऱ्हाळ चालूच राहणार आहे. हा कायदा मागे घेतला जाणार नाही हे सरकारने स्पष्ट केले आहे व ते अशक्यही आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पुढाऱ्यांचे राजकारण आणि जनतेचे मनोरंज...

पराभव नव्हे राजकीय बलिदान !

इमेज
           दिल्ली केंद्रशासित प्रदेश विधानसभेचे कालच निकाल लागले. आम आदमी पक्षाला जनतेने कौल दिला. परंतु, या निवडणुकीतून एक विचार मात्र पुन्हा सिद्ध झाला आहे. या निवडणुकीत भाजप खरोखरच पराभूत झाला की 'विजयी' याचा विचार करावा लागेल.        सीएए च्या विरोधात त्यांनी देशभर गदारोळ माजवला, हिंसाचार केला, देशविरोधी घोषणा देऊन आपले देशविघातक मनसुबे सिद्ध केले तरीही आज 'आप'च्या विजयाने 'त्यांचा' विजय झाला आहे. देशभर 'ते' जल्लोष करीत आहे.         'ते' अल्पसंख्याक असूनही सत्ताधारी त्यांच्या इच्छेप्रमाणे निवडू शकतात. कोणाला जिंकवायचं, कोणाला पाडायचं, कोणावर बहिष्कार टाकायचा हे 'फतवे' ठरवतात. सत्य उमगूनही आजवर काँग्रेसने त्यांची चाटुगिरी सोडली नाही, कारण त्यांना याचे भान होते.         मुस्लिम तुष्टीकरण करून काँग्रेसने 70 वर्ष सत्ता भोगली. हिंदुत्वाविषयी आत्मविस्मृत समाज आणि देशाशी घेणं देणं नसलेल्या लोकांच्या भरवश्यावर हिंदुत्व आणि राष्ट्रवादाचे राजकारण करणाऱ्या भाजपला कोण मत देणार? खरं तर भाजप...

आंदोलन आणि वास्तव (भाग १)

इमेज
 नागरिकत्व कायद्याच्या आणि एनआरसीच्या  मुद्द्यावर देशातील मुस्लिम समुदायाने जे काही आंदोलन चालवले आहे, त्याचा दीड महिना उलटून गेल्यावरही कुणी भ्रम पसरविला गेला असल्यामुळेच हे घडत आहे असे म्हणत असेल तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे. भ्रम किंवा अफवा अल्प काळापुरत्या प्रभाव दाखवीत असतात. सत्य व वास्तव समोर आल्यावर ते स्वीकारल्यानंतर भ्रम संपुष्टात आलेला असतो.  आज नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी सुरू होऊन एक महिन्याच्या वर दिवस उलटून गेले आहेत. देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आपल्या प्रत्येक भाषणात व मुलाखतीत सर्व प्रश्नांची उत्तरं दिले आहेत. त्यामुळे एक विशिष्ट वर्ग सोडला तर सीएए व एनआरसी अन्य लोकांना कळला आहे, तर बाकीचे कळूनही न कळल्याचे सोंग घेऊन फिरत आहे आणि काहींना तर हा कायदा समजूनच घ्यायचा नाहीये असेच म्हणावे लागेल. त्यामुळे यामागे धार्मिक राजकारण आहे हे समजून घेतले पाहिजे.  विदेशी हिंदूंना नागरिकत्व मिळाल्याने हिंदूंची भारतातील संख्या वाढणार, म्हणजेच पर्यायाने मुस्लिमांची संख्या कमी होणार आहे. याचा धसका मुस्लिमांनी घेतलाय का? असा धसका ...

सेना, मनसे आणि 'ते'

इमेज
शरद पवार म्हणतात महाविकास आघाडीत मुस्लिमांच्या सांगण्यावरून सहभागी झालो. अशोक चव्हाण सांगतात महाविकास आघाडीत मुस्लिम समुदायाच्या आग्रहावरून सहभागी झालो. हुसेन दलवाई म्हणतात आम्ही सोनिया गांधी व पक्ष श्रेष्ठींना शिवसेनेचे हिंदुत्व भाजपपेक्षा कसे वेगळे आहे हे समजावून सांगितले.  CAA व NRC च्या मुद्द्यावर आपल्यापासून दूर गेलेले अल्पसंख्याक समुदायाचे मत पुन्हा आपल्याकडे ओढण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी खुलेआम त्यांच्या मोर्चांना व आंदोलनाला पाठिंबा देत आहे. हिंदूंच्या विरोधात गेल्यामुळे आपली सत्ता कोसळेल व भविष्यात फटका बसेल याचा काँग्रेस राष्ट्रवादीला चिंता वाटत नाही. आपल्या हिंदूविरोधी भूमिकेमुळे शिवसेना नाराज होईल आणि त्याचा परिणाम सत्तेवर होईल याचीही चिंता काँग्रेस राष्ट्रवादीला वाटत नाही.  एवढी बेफिकिरी येण्यामागे या तिघाडी सरकारमध्ये काय ठरलं आहे? असा कोणता मुद्दा आहे की ज्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेवर एवढी विश्वास (?) ठेवून आहे. असे अनेक प्रश्न आज जनतेला पडत असतील. कारण एकीकडे शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादी नाराज होईल याची पार चिंता वाटते. त्यासाठी त्यां...

पुस्तक, मोदी आणि बरंच काही...

इमेज
पुस्तक, मोदी आणि बरंच काही... छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा होणे असंभव आहे, अस पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत एका भाषणादरम्यान म्हंटले होते. एवढेच काय तर मी शिवरायांना आदर्श मानतो व त्यांच्यासारखे गुण आत्मसात करून भारतमातेच्या सेवा करू इच्छितो असेही ते म्हणाले होते. त्यामुळे एखाद्या लेखकाला किंवा व्यक्तीला काय वाटतं यात मोदींजींचा मुळात दोष नाही. तरीही चिखलफेक मात्र त्यांच्यावरच होतेय, हे काही योग्य नाही. तथापि, या पुस्तकाच्या निमित्ताने आपण महापुरुषांप्रमाणे होण्याच्या केवळ गप्पाच मारू शकतो किंवा माराव्यात हेच अपेक्षित कार्यच की काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. सलूनवर गेल्यावर न्हाव्याला विशिष्ट कट करायला सांगायचा, पुतळे उभारायचे, विद्यापीठांना नावं देण्यासाठी भांडण करायची, पुतळे कापून पळवायचे, शाइफेक करायची, नाव ठेवायची, गाडीवर फोटो लावायचे, खंडण्या गोळा करून मिरवणुका काढायच्या वगैरे वगैरे अनेक दृढ पद्धती आज अवतरल्या आहेत, ज्याद्वारे आपल्याला आपल्या आदर्श व्यक्तीसारखे होता येते. त्या व्यक्तीच्या गुणांना, कर्तृत्वाला, कर्माला काही स्थान नाही व ते आत्मसातही कुणी करायचे नाहीत. ...

संतांच्या भूमीत संतसाहित्याचा अवमान...

इमेज
संतांच्या भूमीत संतसाहित्याचा अवमान... 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात परिसंवादाचा विषय होता, 'संत साहित्य व बुवाबाजी'. प्रत्येकवेळी चिकित्सा व चर्चा या हिंदू संस्कृतीशी संबंधित विषयांवरच का? बायबल आणि कुराण बद्दल चर्चा व परिसंवाद घेण्याचे तथाकथित पुरोगामी साहित्यिक व आयोजकांकडे नाही का? आपल्या उदार अंतःकरणाने कधीतरी मुस्लिम, ख्रिश्चन बांधवांचाही विचार करावा म्हणतो. शेवटी तीही माणसंच. बिचारी कोणी फतवा काढला की लगेच दगड हाती घेतात आणि समाजसेवेचे ढोंग घे म्हंटल्यावर लगेच मदर तेरेसा होतात. वास्तवदर्शी जीवन महात्म्य आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन भारतमातेच्या सर्व लेकरांना देण्यासाठी कधी तसदी घेणार की नाहीत ही भुरटी माणसं? कुणी मदरश्यात आधुनिक शिक्षण व विज्ञान तंत्रज्ञान शिकवू म्हंटले तर त्यालाही विरोध करायचा आणि आपणहूनही काही प्रयत्न करायचे नाही. मग या भुरट्या पुरोगाम्यांना भारतातील मुसलमानास काय फक्त आतंकवादीच करायचे आहे का? मुसलमानांच्या पोराने केवळ बंदूक आणि दगडच हाती घ्यायचे आणि आपला मात्र उद्देश साधून घ्यायचा असा तर या विचारवंतांचा उद्देश नाही ना? तीन त...

फडणवीसांच्या निमित्याने...

इमेज
महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ अजून स्थापन होईना. आढावा बैठका घेण्यापलिकडे आणि स्थगिती देण्यापलिकडे मुख्यमंत्री महोदयांच्या हाती काही राहिलेले नाही. अश्या अस्ताव्यस्त व राज्य राम भरोसे सुरू असताना विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीत बिघाडी करण्याची भाजपला मोठी संधी आहे. अश्या स्थितीचा फायदा घ्यायचा सोडून भाजपवाले करताय काय? असा प्रश्न माझ्यासोबत अनेकांना नक्कीच पडत असणार. याचे उत्तर फडणवीसांनी झी 24 तास वर झालेल्या मुलाखतीतून दिले आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारची दैना झालेली असताना या संधीचा फायदा घ्यायचे सोडून (मग्रूर, अहंकारी, सत्तापिपासू?) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही सरकारला वेळ द्यायला तयार आहोत. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला विधानसभेत वेळ मागितला आहे. त्यामुळे त्यांनी लवकर मंत्रिमंडळ स्थापन करून राज्याचा गाडा हकण्यास सुरुवात करावी. मग मी तोफ डागणार.  फडणवीस अगदी कसेही असले आणि त्यांच्या विषयी कोणी काहीही विचार करत असले तरी त्यांनी जी राजकीय नैतिकता दाखवली आहे, ती राजकारणात उतरू पाहणाऱ्या नवख्या पिढीसाठी नैतिकतेचे चांगले उदाहरण आहे. "धटाशी ध...